Political News : भाजप नेत्याचा पुन्हा एकदा दावा, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री 'कमळ' हाती घेण्यास इच्छुक

Political News : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  हे भाजपात जाण्यास इच्छुक असल्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी नांदेड येथे खूद्द याबाबत म्हटल्याने आगामी काळात नांदेड शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच नांदेड दाैरा झाला. या दाै-यात त्यांनी मुखेड आणि नांदेड शहरातील सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. त्याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर  यांनी साम टीव्हीशी बाेलताना दुजाेरा दिला.

Beed News : मनोज जरांगेंच्या सभेपूर्वीच बीडमध्ये ५० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; चिठ्ठीतून केली आरक्षणाची मागणी

खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपयांचे थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही पण भाजपाच्या नेत्यांकडे जेव्हा चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारने थकहमी दिली. यावरून लक्षात घेतले पाहिजे असेही चिखलीकर यांनी नमूद केले. दरम्यान काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण सत्तेसाठी येऊ शकतात त्यांचे भाजपात स्वागत आहे असेही चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान भाजपा तिसरा पक्ष फोडणार आहे असे जयंत पाटील म्हणाले होते. यावर बावनकुळे यांनी आम्ही कोणता पक्ष फोडायला जाता नाही, पण भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.

केंद्रातील मोदी सरकारच्या राज्यातील माहिती सरकारच्या विविध योजना व विकास कामे थेट जनतेपर्यंत पोहोचवत आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला व मोदींना समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचे बावनकुळेंनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे , नांदेडचे शहाराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, दक्षिण नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,उतर नांदेडचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, आमदार राम पाटील रातोळीकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नांदेड लोकसभा प्रमुख देविदास राठोड, माजी खासदार सूर्यकांता पाटील, प्रवीण साले, मिलिंद देशमुख, डॉ. मोहन चव्हाण, नवनाथ बन आदी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply