Political News : दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय; सुप्रिया ताई 15 वर्ष दादांमुळे निवडून आल्या; रुपाली चाकणकर कडाडल्या

Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी  प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.  दरम्यान आज  अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी 'सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे.

Vitthal Rukmini Mandir : नववर्षानिमित्त सजला विठुरायाचा गाभारा; मंदिरात फळा-फुलांची आकर्षक सजावट

रुपाली चाकणकर म्हणाल्या,  दादांवर बोलणारे  दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत.  सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत.  दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15  वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत.  बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल. 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *