Political News : विधानसभा हक्कभंग समितीची घोषणा; ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समितीत समावेश नाही

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हक्कभंग समितीची निवड झालेली आहे. हक्कभंग समितीमध्ये आमदार राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. हक्कभंग समितीमध्ये ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला जागा मिळालेली नाही.

हक्कभंग समितीत भाजपचा वरचष्मा दिसत आहेत. 15 सदस्यांच्या हक्कभंग समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. इतर 14 सदस्यांमध्ये भाजप-शिंदेच्या मोठ्या आमदारांचा समावेश आहे. हक्कभंग समितीकडून आता उद्या  संजय राऊत  यांना नोटीस बजावली जाईल आणि त्यांच्याकडून उत्तर मागवलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार अशी चिन्ह दिसत आहेत.

विधानसभेप्रमाणे विधानपरिषदेतीची समिती स्थापन केली जाईल. विधानसभेच्या समितीत ठाकरे गटाचा एखादा आमदार असायला होता. विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागत आहेत. ठाकरे गटाचा आमदारही या समितीत असायला हवा होता, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. समितीत सर्वपक्षांना स्थान असायला हवं होतं. त्यामुळे हा ठाकरे गटावर अन्याय असल्याचं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply