Pimpri Chinchwad Crime : दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगचा पोलिसांनी उतरवला माज, जिथे धिंगाणा केला तिथूनच काढली धिंड

Pimpari-Chinchwad : पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोयत्याची दहशत अधिकच वाढत चालली आहे. अशामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुपीनगर परिसरात किरकोळ कारणावरून व्यवसायिकला कोयत्याने मारहाण करत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना चिखली पोलिसांनी अटक करत त्यांची धिंड काढली.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. रुपीनगरच्या ज्या परिसरात या गावगुंडांनी कोयत्याने व्यवसायिकाला मारहाण करून वाहनांची तोडफोड केली होती. अगदी त्याच परिसरात चिखली पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढली. गावगुंडांना कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. चिखली परिसरातील नागरिकांमध्ये असलेली गावगुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कायदा हातात घेणाऱ्या प्रत्येक गाव गुंडांवर कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा संदेश चिखली पोलिसांनी या निमित्ताने दिला आहे.

New Delhi Rain Record : दिल्लीत पावसाची जोरदार हजेरी, 41 वर्षाचा रेकॉर्ड मोडला

पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगर परीसरातील जुन्या बस स्टॉपजवळ कोयता गँगने ८ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास सात ते आठ वाहनांची आणि एका रेडिमेड कापड दुकानाची तोडफोड करून परीसरात दहशत पसरवली होती. या कोयता गँगने कापड व्यवसायिकाला माराहण देखील केली होती. कोयता गँगने केलेली तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेच पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली आहे.

या घटनेच्या आधीदेखील या कोयता गँगने रुपीनगर परिसरात दोन वेळा गाड्यांची तोडफोड केली होती. त्यामुळे परीसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगला पोलिसांचा काही धाक राहिला नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. या कोयता गँगच्या दहशतीमुळे परिसरातील दुकानं लवकरच बंद करण्यात येत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply