Pimpri Chinchwad : उद्यानातील १ हजार झाडे वाचविण्यासाठी अनोखा निर्णय; पिंपरी चिंचवडमधील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

Pimpri Chinchwad : रावेत परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून महामेट्रो कडून हे इको पार्क उभारण्यात आल आहे. मात्र  आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय इमारत उभी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र असं झाल्यास या पार्क मधील शेकडो झाडे कापावी लागणार आहेत. हि झाडे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

रावेत परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून महामेट्रो कडून हे इको पार्क उभारण्यात आल आहे. मात्र आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय इमारत उभी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र असं झाल्यास या पार्क मधील शेकडो झाडे कापावी लागणार आहेत. ज्यामुळे इथे निर्माण झालेली जैवविविधता नष्ट होईल. त्याचं बरोबर नागरिकांना मिळणारा ऑक्सीजन आणि हे पाच एकरवरील प्रशस्त पार्क देखील उरणार नसल्याने नागरिक या पार्कवर इमारत उभी करण्यास विरोध केला. या बाबत अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे विनंती आणि तक्रार करून देखील सरकार आपलं मत जाणून घेत नसल्याने  मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं नागरिकांचं म्हणण आहे. 

Lok Sabha Election : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

विशेष म्हणजे एका उद्यानातील १ हजाराहून झाडे वाचावीत या उद्देशाने नागरिकांनी हे टोकाचं पाऊल उचलल आहे. मागील दीड वर्षापासून रावेत परिसरातील मेट्रो इको पार्क नागरिकांसाठी बंद करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उद्यानातील झाडांना पाणी दिलं जातं नसल्याने ते मरणासन्न अवस्थेत गेली आहेत. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून जिल्हा प्रशासन यासाठी कारणीभूत असल्याचं नागरिकांचं म्हणण आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply