Pimpri Chinchwad : 'ड्रीम 11' वर PSI रातोरात झाला कोट्यधीश, पण आता उडाली झोप; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pimpri Chinchwad : 'पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑन ड्युटी ड्रीम ११ हा ऑनलाइन गेम खेळणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. अगदी आठवडाभरापूर्वी झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेमवर टीम बनवून दीड कोटींचं बक्षीस जिंकलं होतं. या गोष्टीची राज्यभरात चर्चा झाली होती. 

अनेकांनी झेंडे यांना फोन करुन शुभेच्छाही दिल्या होत्या. तर काहींनी यावर आक्षेप देखील घेतला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत झेंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घेतली होती.

Manchar News : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यात तीस प्रशिक्षण केंद्रांचे होणार ऑनलाइन उद्घाटन

सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी तपासून सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आता झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनॉयकुमार चोबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका सोमनाथ झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांनी कोणत्याही खेळ प्रकारात सहभाग घेण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती.

तसेच यांचे आर्थिक उत्पनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे. दरम्यान, याबाबत साम टीव्हीने झेंडे यांच्याशी संवाद साधला असता, आपण सुट्टीवर असल्यामुळे कारवाईबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर विभागीय चौकशी साठी पुढील तपास डीसीपी बंगर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिस दलातील जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply