Pandharpur News : पुढील वर्षभरातील विठुरायाच्या नित्यपूजेचे बुकिंग फुल्‍ल; मंदिर समितीला मिळणार इतके उत्‍पन्‍न

पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची पहाटे होणारी एकमेव नित्यपूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात होणाऱ्या ३०० नित्यपूजेचे बुकिंग फुल झाले. या नित्यपुजेतून मंदिर समितीला ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली. 

दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची नित्यपूजा केली जाते. कोरोना काळात नित्य पूजा बंदी‌ होती. पुजा सुरू करण्याचा निर्णय झाल्यापासून नित्यपूजेला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या 300 नित्य पूजेपूजेचे बुकिंग मार्च महिन्यातच फूल झाले आहे.

पूजा करणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचे बुकिंग करून श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी २५ हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी ११ हजार रूपये भरावे लागतात. ठरलेल्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांचे नातेवाईक अशा दहा ते बारा लोकांना नित्य पूजेसाठी सकाळी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्यपूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना दिली जाते. हळद, कुंकू लावून देवाला पेढे आणि फळांचा महाप्रसाद दाखवला जातो.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *