Pandharpur : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत दोन वर्षाची चिमुकली पडली अन् भाविकांत गाेंधळ उडाला, अखेर...

Pandharpur : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आज (गुरुवार) लाखो भाविकांनी चंद्रभागा स्नान  करून विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी याचा ही अनुभव आज भक्तांना आला. या बरोबरच याची देही याची डोळा असा कार्तिकीचा अनुपम्य सोहळा देखील भाविकांनी अनुभवला. दरम्यान चंद्रभागा स्नानासाठी गेलेल्या एकाचे बाळ पाण्यात पडले. त्यास वेळीच उपचार मिळाल्याने ते बचावले. 

कार्तिकी एकादशी निमित्त कल्याण येथून आलेल्या आकाश शिंदे हे त्यांच्या आकांक्षा या दाेन वर्षाच्या चिमुकलीला घेवून‌ आज सकाळी चंद्रभागा स्नानासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या चिमुकलीला फिट आली. त्यामुळे ती पाण्यात पडली.

घाबरलेल्या शिंदे यांना स्थानिक स्वयंसेवकांनी मदत करून पाण्यातून बाहेर काढले. या चिमुकलीला 65 एकर परिसरातील महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी दाखल केले. येथील डाॅक्टरांनी त्या चिमुकलीवर उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने‌ त्या चिमुकलीचे प्राण वाचले. शिंदे यांनी वैद्यकीय अधिका-यांचे आभार मानले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply