Pandharpur News : पंढरपूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; ११ लाखांचा साठा जप्त

Pandharpur News : पंढरपूर जवळील कासेगाव परिसरात बनावट रासायनिक खत तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याशी आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेशी थेट संबंधित असलेल्या अशा गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने कृषी विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

कासेगावमधील विठ्ठल खत कारखान्यात ही बनावट खत निर्मिती सुरू होती. महालक्ष्मी फर्टिलायझर एलएलपी या कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या खतांची विक्री थेट शेतकऱ्यांना करण्यात येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात विविध कंपन्यांच्या नावाने बनावट खताची ७०० पोती तयार केली जात होती. या खतांची एकूण किंमत सुमारे ११ लाख १२ हजार रुपयांपर्यंत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

IIT Bombay : मुंबई IIT मध्ये शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

 

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाला या कारखान्याबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. कारवाई दरम्यान साठवलेले खत हे कुठल्याही नियमांनुसार रजिस्टर्ड नव्हते आणि त्यात रासायनिक प्रमाणांची अचूकता होती. बनावट खतांची विक्री केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण भविष्यातील उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील सुदीप सुरेश साळुंखे, अहमदनगर जिल्ह्यातील हंडी निमगाव येथील योगेश बाळकृष्ण जाधव आणि पंढरपूरजवळील विठ्ठल खत कारखाना यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी रासायनिक खत आदेश, १९८५ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम २, ३ आणि ७ नुसारही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *