Pandharpur : विठुरायाच्या दर्शनाने मन सुखावले; पदस्पर्श दर्शनाला सुरवात, भाविकांची गर्दी

Pandharpur : तब्बल अडीच महिन्यानंतर आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. आज पहाटे दर्शन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अनेक भाविकांनी विठुरायाचे डोळे भरून दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी मन सुखावल्याची भावना व्यक्त केली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. त्यानंतर‌ आजपासून पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दरम्यान पहाटे पालकमंत्र्यांच्या हस्ते नित्य पूजा करून दर्शनाला सुरवात झाली. यानंतर रांगेत उभ्या भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेत विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात साठवून घेतले. 

Nashik Crime : नेपाळी तरुणाला दिला पेठचा जन्म दाखला व आधार कार्ड; नाशिकमधील आधार केंद्रावरील दोघे ताब्यात

पदस्पर्श दर्शनाला आजपासून सुरवात होणार होती. शिवाय ३ जूनला एकादशी असल्याने शेकडो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यामुळे मंदिरात दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली आहे. राज्यभरातून अनेक भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आले आहेत. पदस्पर्श दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply