Pandharpur News : पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना जेवणाचीही सुविधा

Pandharpur News : पंढरपुरात माघी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेला अजून दोन दिवस बाकी असताना यात्रेसाठी पंढरपुरात आतापासूनच सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे.

पंढरपुरात आषाढी, कार्तिकी एकादशीप्रमाणे माघी यात्रेला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. मंगळवारी अर्थात २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून सुमारे चार ते पाच लाख येतील असा अंदाज आहे. यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी वारकऱ्यांनी फुलू लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत आले. 

Follow us -

Accident News क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि ट्रकमध्ये धडक, ४ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

दर्शन रांगेतील भाविकांना जेवणाची सुविधा   

पंढरपूरमध्ये आलेले भाविक दर्शन रांगेत लागले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत पोहचली असून. तर दहा पैकी सात पत्रशेड पूर्ण भरले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. याशिवाय यंदा प्रथमच मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply