पंचांग २६ ऑक्टोबर २०२६: नवान्न पौर्णिमा, राशी परिवर्तन योग आणि महर्षी वाल्मिकी जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जात आहे. महर्षी वाल्मीकी हे प्राचीन भारतातील अत्यंत महान ऋषी आणि आदिकवी मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक ग्रंथांनुसार त्यांनी संस्कृत भाषेमध्ये 'रामायण' या पवित्र महाकाव्याची रचना केली. या महाकाव्यात प्रभू श्रीरामांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचे उच्च आदर्श, माता सीतेचा संघर्ष तसेच विविध कौटुंबिक नातेसंबंधांचे अतिशय सुंदर व सखोल वर्णन आढळते. त्यांच्या या अजरामर रचनेने भारतीय साहित्य, संस्कृती आणि लोकपरंपरांवर अतिशय खोलवर प्रभाव पाडला आहे. याशिवाय आज नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नानारंभ, ज्येष्ठ अपत्यास निरांजन ओवाळणे आणि शेतजमीनीमध्ये भूमिपूजन हे दिनविशेष देखील आहेत. मेष राशीत चंद्र आणि कर्क राशीत मंगळ असल्यामुळे आज मंगळ व चंद्राचा विशेष 'राशी परिवर्तन योग' सुद्धा तयार होत आहे.

आजची पंचांग माहिती (दिनांक २६ ऑक्टोबर २०२६)

  • वार: सोमवार

  • तिथी: पौर्णिमा तिथी सकाळी ०९:४२ वाजेपर्यंत, त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ

  • नक्षत्र: आश्विनी नक्षत्र सायं. ०५:४२ वाजेपर्यंत, त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ

  • पक्ष: शुक्ल पक्ष - पौर्णिमा

  • राष्ट्रीय मिति: आश्विन १४, शके १९४७ / विक्रम संवत २०८३

  • योग: वज्र योग दु. ०२:१७ वाजेपर्यंत, त्यानंतर सिद्धी योग

  • करण: बव करण सकाळी ०९:४२ वाजेपर्यंत, त्यानंतर कौलव करण प्रारंभ

  • ऋतू: हेमंत ऋतू

  • चंद्र राशी: मेष राशी

  • सूर्य स्थिती: दक्षिणायन

सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रमान माहिती

  • सूर्योदय: सकाळी ०६:३८ वाजता

  • सूर्यास्त: संध्याकाळी ०६:०७ वाजता

  • चंद्रोदय: संध्याकाळी ०६:०५ वाजता

  • चंद्रास्त: सकाळी ०६:२८ वाजता

समुद्र किनारपट्टीची भरती-ओहोटी माहिती

  • पूर्ण भरती: सकाळी ११:२७ वाजता (पाण्याची उंची ०४.१५ मीटर), रात्री १२:१८ वाजता (पाण्याची उंची ०४.७२ मीटर)

  • पूर्ण ओहोटी: पहाटे ०५:३३ वाजता (पाण्याची उंची ०१.१९ मीटर), संध्याकाळी ०५:३७ वाजता (पाण्याची उंची ०.०९ मीटर)

सोमवारचे शुभ मुहूर्त (Auspicious Timings)

  • ब्रह्म मुहूर्त: पहाटे ०४:४६ ते ०५:३८ वाजेपर्यंत

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४२ ते दुपारी १२:२७ वाजेपर्यंत

  • अमृत काल: सकाळी १०:५९ ते दुपारी १२:२८ वाजेपर्यंत

  • विजय मुहूर्त: दुपारी १३:५७ ते १४:४२ वाजेपर्यंत

  • गोधुली बेला: संध्याकाळी १७:४१ ते १८:०७ वाजेपर्यंत

  • निशिथ काळ: रात्री २३:४० ते ००:३१ वाजेपर्यंत (ऑक्टोबर २६)

सोमवारचे अशुभ मुहूर्त व राहुकाळ (Inauspicious Timings)

  • राहुकाळ: सकाळी ०७:५३ ते ०९:१७ वाजेपर्यंत

  • यमगंड काळ: सकाळी १०:४१ ते दुपारी १२:०५ वाजेपर्यंत

  • गुलिक काळ: दुपारी १३:२९ ते १४:५३ वाजेपर्यंत

  • दुमुर्हूत काळ: दुपारी १२:२७ ते १३:१२ आणि दुपारी १४:४२ ते १५:२७ वाजेपर्यंत

  • वर्ज्य काळ: दुपारी १३:५८ ते १५:२७ आणि रात्री ०२:२८ (ऑक्टोबर २७) ते कट्ट पहाटे ०३:५६ वाजेपर्यंत

विशेष उपाय

आचार्य कृष्णदत्त यांच्या मार्गदर्शनकानुसार, महर्षी वाल्मिकी जयंतीच्या आणि पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी रामायणातील किंवा श्रीरामचरितमानस मधील एखाद्या अध्यायाचा वा पाठाचा अभ्यास किंवा वाचन करावे. यामुळे घरात सुख, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *