Palghar Talasari Hospital : पालघरला मांत्रिकाकडून ग्रामीण रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार?

Palghar : देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण दुसऱ्या बाजूला मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे. सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल हाेत आहे.

Bomb Blast Threat : देशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा, PM मोदींना जीवे मारण्याची धमकी... पुण्यात खळबळ

तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोमा लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान रुग्णालय व्यवस्थापनाच्या कानी हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितास विराेध केला. परंतु ताेपर्यंत वेळ निघून गेली हाेती. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन पाेलिसांत तक्रार देणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply