Ola Cab Driver Arrested for Abusing FDA Commissioner Tukaram Mundhe in Viral Video!

मुंबई: गुटखा बंदीचा राग! आयुक्त तुकाराम मुंढेंना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या ओला चालकाला अटक!

Ola Cab Driver Arrested for Abusing FDA Commissioner Tukaram Mundhe in Viral Video! मुंबई: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा विक्रीवर कडक बंदी घातली असून, विक्रेत्यांवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे राज्यातील अनेक भागांत गुटख्याची टंचाई निर्माण झाली असून भेसळ माफियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कल्याणमधील दुर्गाप्रसाद पांडे हा ओला कॅब चालक या कारवाईमुळे चांगलाच नाराज होता. त्याच्या वडिलांची पान टपरी देखील गुटखा बंदीच्या कारवाईमुळे बंद झाली होती. याचा राग मनात धरून त्याने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला.

 

पोलीस कारवाई: व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमर वाघमोडे यांच्या पथकाने अवघ्या चार तासांत आरोपी दुर्गाप्रसाद पांडे याचा शोध घेऊन
त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *