पुणे: आझाद मैदान, मुंबई येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे आंदोलनकर्ते स्वर्गीय विजय घोगरे (रा. टाकलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग/राज्य मानवाधिकार आयोगाकडे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर तक्रार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज शामराव आखरे यांनी संभाजी ब्रिगेडचे कायदा सल्लागार अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यामार्फत दाखल केली होती. तक्रारीमध्ये आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छता सुविधा, वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, पावसापासून संरक्षण तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिनांक २३जून २०२६ रोजी आदेश पारित करून सदर प्रकरण मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविले आहे. आयोगाने संबंधित प्राधिकरणास तक्रारदार/पीडित पक्षाला चौकशीत सहभागी करून घेण्याचे, कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे तसेच चार आठवड्यांच्या आत आयोगाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तक्रारीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच जाहीर केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत शासनाला पूर्वकल्पना असतानाही आवश्यक वैद्यकीय सुविधा व मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मराठा आंदोलक स्वर्गीय विजय घोगरे यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत असलेल्या जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अॅड. मनोज आखरे यांनी सांगितले की, "ही तक्रार केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून भविष्यात कोणत्याही आंदोलनादरम्यान नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेसाठी शासनाची जबाबदारी निश्चित व्हावी, या उद्देशाने करण्यात आली आहे."
अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सांगितले की, "मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित प्राधिकरणाला चौकशीचे आदेश दिले आहेत. स्वर्गीय विजय घोगरे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना व्हाव्यात, हीच आमची अपेक्षा आहे."
शहर
- पांगरी गावाला हादरा! बेकायदेशीर उत्खननामुळे होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना पडले तडे; ग्रामस्थ आक्रमक.
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल: २२४ पोलीस निरीक्षकांना बढती, ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!
- पांगरी गावाला हादरा! बेकायदेशीर उत्खननामुळे होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना पडले तडे; ग्रामस्थ आक्रमक.
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
गुन्हा
- पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारी टोळी जेरबंद! १० दिवसांच्या अथक पाठलागानंतर पोलिसांचे मोठे यश.
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- रोज फक्त ५० रुपयांची बचत करा आणि मिळवा ३५ लाखांचा मोठा फंड; पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' करेल मालामाल!
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
























Subscribe to my channel


