पुणे: शहरावर वाढणारा लोकसंख्येचा ताण आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, नवी मुंबईच्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात 'नवे पुणे' विकसित करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुण्याचा नियोजित विस्तार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'नवे पुणे' का आवश्यक?
गडकरी म्हणाले की, "देशातील काही मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येची वाढ मर्यादित ठेवण्याचा विचार करणे काळाची गरज आहे. अन्यथा रस्ते आणि पूल कितीही बांधले, तरी भविष्यात रस्त्यावर चालणेही कठीण होईल. त्यामुळे पुण्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुरंदरच्या दिशेने शहराचा नियोजित विकास करणे आवश्यक आहे."
पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान:
पुण्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यात गडकरी यांनी माहिती दिली की, पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केली जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये मलेशियातील तंत्रज्ञानाचा वापर करून खांबांमधील अंतर १२० मीटर ठेवले जाणार आहे, ज्यामुळे खांबांची संख्या आणि प्रकल्पाचा खर्च कमी होईल. या मार्गांवर तळाला रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वांत वर मेट्रो अशी त्रिस्तरीय रचना असेल.
प्रवासाचा वेळ वाचणार:
पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत, तर छत्रपती संभाजीनगर-नागपूर प्रवास अडीच तासांत पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारे पुणे ते नागपूर अंतर केवळ साडेचार तासांत गाठणे शक्य होणार आहे.
इतर महत्त्वाच्या घोषणा:
पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
नन्हे-रावेत उन्नत महामार्गाचा डीपीआर (DPR) तयार असून, लवकरच कामाला सुरुवात होईल.
पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक नवीन द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून, त्याच्या पहिल्या टप्प्याची निविदा तीन महिन्यांत काढली जाईल.
ठाणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामालाही लवकरच सुरुवात होईल.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


