Nitesh Rane : सांगली काॅंग्रेस उद्धव ठाकरेंपुढे झुकणार नाही, संजय राऊतांचा ताेंडदेखला दाैरा: नितेश राणे

Nitesh Rane : निवडणूका म्हणजे उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. तिकीट (उमेदवारी) विक्रीचा त्यांचा हा धंदा जूनाच आहे. सांगलीमध्ये व्यवहार करण्यासाठीच खासदार संजय राऊत  हे गेल्याचा गंभीर आराेप भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे व राऊत यांच्यावर केला. दरम्यान राणे म्हणाले संजय राऊत यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटले वसूली करणा-यांना भाजपने घेतलं आहे. याचा अर्थ असा हाेताे महाविकास आघाडी वसुली सरकार हाेते आणि आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे

खासदार संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यावर नितेश राणे   म्हणाले उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सांगलीला आहेत असे चित्र दाखविले जात आहे. पुण्यातून काॅंग्रेसच्या एका नेत्याने मला फाेन केला. ते म्हणाले सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील  यांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्री वरून आला आहे अशी माहिती मला मिळाली आहे असेही राणेंनी नमूद केले

NIA Attacked In Bengal: पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला, २ अधिकारी जखमी

राणे पुढं बाेलताना म्हणाले संजय राऊत काँग्रेसला झुकविण्यासाठी सांगलीला गेलेत. हे खरं आहे की खोट याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी. परंतु काॅंग्रेस त्यांना जुमानणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. निवडणूक हे उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. त्यांचा तिकीट विक्रीचा धंदा आहे असा गंभीर आराेप राणेंना केला.

दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होते. आज त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे असेही नितेश राणेंनी नमूद केले.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *