Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्रा करणार देशाचे नेतृत्व; जाणून घ्या भारतीय संघ

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी देशाचा मैदानी स्पर्धेसाठीचा (ऍथलेटिक्स) संघ गुरुवारी एफआयने जाहीर केला. या संघाचे नेतृत्व ऑलिंपिकपटू नीरज चोप्रायाच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यंदा एएफ आयने AFI जाहीर केलेल्या संघात 18 महिला खेळाडूंनास्थान मिळालेला आहे. यामध्ये हिमा दास आणि दुती चंद या गुणवान खेळांडूचा देखील महिला संघात रिलेसाठी समावेश झालेला आहे. 

AFI चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले ज्यांना फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले गेले आहे आणि जे परदेशात स्पर्धा करत आहेत ते खेळाडू वगळता निवडलेले अन्य खेळाडू 28 जुलै ते आठ ऑगस्ट राष्ट्रकुल स्पर्धेपुर्वी USA मधील चुला व्हिस्टा येथे प्रशिक्षण घेतील. त्यांच्या व्हिसाच्या प्रतीक्षेत आम्ही आहाेत.

पुरुष : अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया (लांब उडी), अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रवेल आणि एल्डोस पॉल (ट्रिपलचेस), तेजिंदरपाल सिंग तूर (शॉट थ्रो) ); नीरज चोप्रा, डीपी मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री; अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथन पांडी आणि राजेश रमेश (4×400 मीटर रिले).

महिला: एस धनलक्ष्मी (100 मी आणि 4×100 मीटर रिले), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा), ऐश्वर्या बी (लांब उडी आणि तिहेरी उडी) आणि अँसी सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉट थ्रो), नवजीत कौर धिल्लॉन आणि सीमा अंतिल पुनिया ( डिस्क थ्रो), अन्नू राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंग आणि सरिता रोमित सिंग (वायर शॉट), भावना जाट आणि प्रियांका गोस्वामी, हिमा दास, दुती चंद, श्रावणी नंदा, एमव्ही जिलाना आणि एनएस सिमी (4x100m रिले).

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply