
NCP Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या वयाचा मुद्दा काढून सुप्रिया सुळे या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याचे तटकरे यांनी म्हटले. श्रीनिवास पाटील हे पितृतुल्य व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांचा आदर आहे पण राजकीय लढाईत वय आणि इतर गोष्टी मागे पडतात असेही तटकरे यांनी म्हटले.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज होणाऱ्या सुनावणी आधी सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. यामध्ये लोकसभेतून सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. तर, राज्यसभेत फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी टीका करताना श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले, पक्षासाठी चांगले काम केले. 83 वयाच्या खासदाराविरोधात असे पाऊल उचलल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली होती.
|
Gunratn Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना धक्का! एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल |
सुप्रिया सुळेंना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी म्हटले की, दादा दादा बोलत असे काहींचे बारामतीत आयुष्य गेले. त्यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करताना त्यांच्या कामाचा विचार केला नाही का असा सवाल तटकरे यांनी केला. पाटील यांच्या वयाचा मुद्दा काढून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुप्रिया सुळेंकडून सुरू आहे. पाटील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे. मात्र, राजकीय लढाईत वय आणि इतर गोष्टी मागे पडतात असे तटकरे यांनी सांगितले.
शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बोलताना तटकरे यांनी म्हटले की, अविश्वासदर्शक ठरावाच्या व्हीप आधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. जयंत पाटील यांना त्याबाबत विचारा, अन्यथा योग्य वेळ आल्यानंतर भाष्य करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान झालेच नाही. त्यामुळे व्हीपच्या उल्लंघनाचा मुद्दा येत नसल्याचे तटकरे यांनी म्हटले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




