NCP Sunil Tatkare : सहानुभूती मिळवण्यासाठी सुप्रिया सुळेंची केविलवाणी धडपड; सुनील तटकरेंनी साधला निशाणा

NCP Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या  नेत्या खासदार सुप्रिया सुळे  यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील  यांच्या वयाचा मुद्दा काढून सुप्रिया सुळे  या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याचे तटकरे यांनी म्हटले. श्रीनिवास पाटील हे पितृतुल्य व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांचा आदर आहे पण राजकीय लढाईत वय आणि इतर गोष्टी मागे पडतात असेही तटकरे यांनी म्हटले.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज होणाऱ्या सुनावणी आधी सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. यामध्ये लोकसभेतून सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. तर, राज्यसभेत फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी टीका करताना श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले, पक्षासाठी चांगले काम केले. 83 वयाच्या खासदाराविरोधात असे पाऊल उचलल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. 

Gunratn Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना धक्का! एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

सुप्रिया सुळेंना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी म्हटले की, दादा दादा बोलत असे काहींचे बारामतीत आयुष्य गेले. त्यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करताना त्यांच्या कामाचा विचार केला नाही का असा सवाल तटकरे यांनी केला. पाटील यांच्या वयाचा मुद्दा काढून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुप्रिया सुळेंकडून सुरू आहे. पाटील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे. मात्र, राजकीय लढाईत वय आणि इतर गोष्टी मागे पडतात असे तटकरे यांनी सांगितले. 

शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बोलताना तटकरे यांनी म्हटले की, अविश्वासदर्शक ठरावाच्या व्हीप आधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. जयंत पाटील यांना त्याबाबत विचारा, अन्यथा योग्य वेळ आल्यानंतर भाष्य करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान झालेच नाही. त्यामुळे व्हीपच्या उल्लंघनाचा मुद्दा येत नसल्याचे तटकरे यांनी म्हटले.  

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply