NCP Merger : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शिंदे पुन्हा बोलले, ठाम भूमिका मांडली, VIDEO

image

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या मुद्द्यावर लेखातून भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. विलिनीकरणाचा विषय सध्या आमच्यासाठी बंद असल्याचं शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एनडीएसोबत राहावं की नाही हे राष्ट्रवादीनं ठरवावे, असंही शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

एनडीएशी चर्चा कुणी करायची ? हे कोणी विचारायला हवं? एनडीएसोबत चर्चा आम्ही करायची का? त्यांनी चर्चा करायला हवी. एनडीएसोबत राहायचं किंवा त्यांच्यासोबत आघाडी करायची की नाही हा त्या पक्षाचा अधिकार आहे. सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो स्वीकारायचा की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. कारण चर्चा करणाराच आमचा नेता नाही किंवा त्यांच्या पक्षाचा प्रमुख राहिला नाही. त्यामुळे आम्ही जर-तरच्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *