Navi Mumbai News : नेरूळच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह; नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai : नवी मुंबईतील नेरूळ येथे आज शुक्रवारी चिंचोली तलावातील पाण्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृत महिलेचं वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

नवी मुंबईत नेरूळजवळ महापालिकेचं चिंचोली शिरवणे तलाव आहे. या तलावात एका महिलेचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह पाण्यावर तरंगला होता. ही माहिती परिसरात समजल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलीस, महापालिका प्रशासनातील कर्मचारी-अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात तो विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. ही महिला नेमकी कोण आहे याबाबतची माहिती वृत्त हाती येईपर्यंत समजले नाही. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हत्या की आत्महत्या? तपास सुरू

चिंचोली तलावात पाण्यावर महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. वाशी येथील रुग्णालयात तो पाठवण्यात आला. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा तपास केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply