Navi Mumbai Fire : नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट, अग्निशमन दल घटनास्थळी

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतून आगीची मोठी घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीमधील एका इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांची एकच धावाधाव झाली. कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खैरणे येथील एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं ठरलं; लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करणार

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नवी मुंबईतील ही केमिकल कंपनी असल्याने आगीची भीषणता मोठी आहे. एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या आहेत. या कंपनीत कुणी अडकलेले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

तत्पूर्वी, नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीची आगीची भीषणता जास्त असल्याने शेजारी असणाऱ्या दोन कंपन्यांना देखील आग लागली. नवभारत केमिकल, क्लीनकेम लॅब आणि जास्मिन आर्ट अँड प्रिंट या तीन कंपन्यांना आग लागली. या आगीमुळे अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या कंपन्यांना आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाकडून केमिकल कंपनीवर फोमचा मारा करण्यात येतोय. तर इतर दोन कंपन्यांना पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचत नसल्याने आगीची भीषणता वाढत असल्याचा आरोप एका कर्मचाऱ्याने केला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply