Nashik’s Water Crisis: 13 of 26 Dams Dry; Irrigation Halted as Storage Dips to 21%

नाशिककरांची चिंता वाढली! जिल्ह्यातील २६ पैकी १३ धरणं पूर्णपणे आटली; सिंचनासाठीचे पाणी बंद

Nashik’s Water Crisis: 13 of 26 Dams Dry; Irrigation Halted as Storage Dips to 21%नाशिक: पावसाचे आगमन झाले असले तरी नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, जिल्ह्यातील मध्यम व लघू जलप्रकल्प असलेल्या एकूण २६ धरणांपैकी १३ धरणे पूर्णपणे आटली आहेत. प्रशासनाने धरणांमधील उपलब्ध जलसाठा केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे आदेश दिले असून, सिंचनासाठी सोडण्यात येणारी सर्व आवर्तने बंद करण्यात आली आहेत.

 

 

सध्या नाशिक जिल्ह्यात केवळ २१.०९ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. सर्व धरणे मिळून आता सुमारे १४ हजार ८९४ दशलक्ष घनफूट (दलघफू) इतकाच पाणीसाठा उरला आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा ३५ टक्क्यांवर होता, यावरून यंदाच्या परिस्थितीची भीषणता लक्षात येते.

६७० गावे तहानलेली: जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे १७९ गावे आणि ४९१ वाड्या-वस्त्या, अशा एकूण ६७० गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील सुमारे ३ लाख २८ हजार ८७८ नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी १८६ टँकर्सचा वापर केला जात असून, हे टँकर दररोज ४०५ फेऱ्या करत आहेत.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा:

  • गंगापूर: ३२.१०%

  • वालदेवी: ३०.८९%

  • मुकणे: १९.३१%

  • करंजवण: १६.४२%

  • ओझरखेड: २५.८७%

  • दारणा: ७.१६%

  • भावली: १६.३९%

  • कडवा: १६.८८%

  • चणकापूर: ३१.११%

  • गिरणा: २७.६६%

प्रशासनाचा इशारा: निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी सांगितले की, पावसाचे आगमन लांबल्याने पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले असून, यासाठी विशेष पथकांची गस्तही सुरू करण्यात आली आहे.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये  https://punenews24.in/



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *