Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख, CM शिंदेंची घोषणा

मुंबई : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे 22 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, नाशिकमधील कळवण इथं सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pune : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला, वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पाच रुग्णांना नाशिक इथं हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply