Nashik Accident : ब्रेकिंग! नाशिकमध्ये कार- बसचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार

Nashik Accident : नाशिकमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नाशिकच्या नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावर बस व मारुती कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २ वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावर बस व मारुती कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मनमाड आगाराची ही बस चाळीसगावहून मनमाडकडे येत होती. यावेळी नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे बस आणि मारुती कारचा भीषण अपघात झाला.

Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; दुसरबीड ग्रामपंचायतीवर काढला हंडा मोर्चा

ही धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत २ वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचुर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, सोलापूरमधूनही एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या देगावजवळ सोलापूर - मंगळवेढा महामार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. जाअपघातात एक जण जागीच ठार तर झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक केनगाडे असे या अपघातातील मृत युवकाचे नाव आहे, तर सुदर्शन काळे असे जखमी युवकाचे नाव आहे

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply