
Maharashtra Monsoon Updates 2023: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. उशीराने आलेल्या मान्सूनने एका दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे.
हवामान खात्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीराने दाखल झाला होता.
११ जून रोजी मान्सूनचं कोकणात आगमन झालं होतं. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन राज्यभरात रखडलं. त्यामुळे मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची वाट बळीराजा पाहत होता.
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला
अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाकडून दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच,राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली.
मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, यासह विविध जिल्ह्यात पावसानं पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली. मुंबईत आज सकाळपासूनचं पावसाचा जोर सुरू होता. दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पुढचे ५ दिवस सक्रिय राहणार आहे.
राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे
पुढील पाच दिवसांत कुठे कुठे पाऊस असणार आहे, त्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यानुसार कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे. मुंबई पुणे, रायगड सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रायगडसह कोकणाला धोक्याचा इशारा
मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


