भोंदूबाबाचा भांडाफोड: महिलांच्या शोषणापासून कोट्यवधींच्या फसवणुकीपर्यंत धक्कादायक उघड!

 

Nashik : एका भोंदूबाबाच्या नावाखाली चाललेला भयानक खेळ आता उघडकीस येतोय! अध्यात्म, भक्ती आणि विश्वासाच्या नावावर महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक... आणि आता हेल्पलाइनवर तक्रारींचा स्फोट! नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. फक्त २३ दिवसांत शेकडो कॉल्स! दररोज ५ ते ६ तक्रारी... आणि यात बहुतेक महिला! विश्वासघात, दबाव, फसवणूक... या भोंदूबाबाने किती घरं उद्ध्वस्त केली असतील?" "मागील २३ दिवसांत विशेष हेल्पलाइनवर शेकडो कॉल्स आले आहेत. पोलिसांनी महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्याने अनेक बळी पुढे आले. आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी ८ महिलांवर अत्याचाराशी संबंधित. ४० जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आले आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले असून, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने खरातच्या कार्यालयावर छापे टाकले. नाशिक, पुणे आणि शिर्डीमध्ये छापेमारी करून कोट्यवधी रुपयांच्या कागदपत्रे जप्त करण्यात आली. ईडीने २ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम देखील गोठवली आहे. आज नाशिक कोर्टात अशोक खरातची पुन्हा हजेरी आहे. चौथ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी आज संपत असल्याने पाचव्या गुन्ह्यात ताबा घेण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाकडून छाप्यांमधील पुरावे सादर केले जाणार आहेत." "मित्रांनो, ही फक्त एक व्यक्तीची कहाणी नाही... ही अंधश्रद्धा, भोंदूबाजी आणि महिलांच्या शोषणाची कहाणी आहे. भाविकांना देवाच्या नावाने फसवणे, महिलांना विश्वासात घेऊन गैरफायदा घेणे... हे किती मोठे पाप आहे! अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सुद्धा याबाबत कठोर कारवाईची मागणी करत आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे." "नाशिक पोलिस आणि न्यायव्यवस्थेने या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “भोंदूबाबाचा भांडाफोड: महिलांच्या शोषणापासून कोट्यवधींच्या फसवणुकीपर्यंत धक्कादायक उघड!

Leave a Reply to Cooper63 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *