
Nashik : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे घडली आहे. घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केलेल्या तक्रारीवरून महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणात केला.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील कल्याणी संतोष शिरसाठ (वय ३५) या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरची मंडळी आक्रमक झाली होती. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
विहिरीत उडी घेत संपविले जीवन
कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली; असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आत्महत्येस जबाबदार म्हणून पती, सासू, सासरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्याची मागणी केली जात आहे .
सासरच्या अंगणात केला अंत्यविधी
दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या बहादुरी येथील सासरच्या घराच्या अंगणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तर कल्याणीच्या अंत्यविधीस पती, सासरा व सासू हे उपस्थित नव्हते. अंगणात करण्यात आलेल्या अंत्यविधीच्या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

