Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरले; जुन्या भांडणातून दोघांवर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू

Nashik : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. यातच पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी एका तरुणावर प्राणघात हल्ला करण्यात आला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांत तीन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच १ मे रोजी पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. यात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रितेश डोईफोडे असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून रितेश डोईफोडे याच्यासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Sand Mafia : हिंगोलीत वाळू माफियांचा हैदोस; तहसील कार्यालयातून जप्त केलेले ट्रॅक्टर पळवले

दोघांवर केला हल्ला

रितेश व त्यांचा मित्र सोबत जात असताना रितेशवर एकाने प्राणघातक हल्ला केला. यावेळी रितेशचा मित्र त्याला सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर रितेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी रुग्णालयात गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे.

हत्या केल्यानंतर संशयित पोलिसात जमा

विशेष बाब म्हणजे ज्यांनी रितेशची हत्या केली. यानंतर संशयित आरोपी स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे. याठिकाणी त्याने खून केल्याची माहिती दिली. याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहे. एकंदरीत मागील आठ दिवसांत नाशिकमध्ये तिसरी खुनाची घटना घडली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply