Narendra Modi : पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; १ एप्रिलला मुंबईत येणार, हे आहे खास कारण

Narendra Modi : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. १ एप्रिल रोजी मोदी मुंबईत येणार असून आरबीआयच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती माहिती आहे. मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मोदींचा हा चौथा दौरा आहे.

याआधी नरेंद्र मोदी अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. त्याआधी मोदी हे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजर राहिले होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावरही येऊन गेले.

Maharashtra Politics : अमरावतीत आज महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन, बळवंत वानखडे नामांकन अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणूक  जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौरा केला होता. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते वितरीत करण्यात आले होते

त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे देखील मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, यावेळी त्यांचा दौरा राजकीय नसणार अशी माहिती मिळत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२४ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA), नरिमन पॉइंट, मुंबई येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply