Nandurbar Traffic Police : वर्षभरात ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई; नंदुरबार वाहतूक पोलिसांची कारवाई

Nandurbar : अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग तसेच शहरात बेशिस्तपणे वाहन चालवून नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे बऱ्याचदा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतो. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांची नजर असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे नंदुरबार शहरात मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे गाडी चालविणे व रस्त्यांवर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नजर ठेवत शहरातील ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांना शिस्त लागणार आहे.

Social Media Overuse Impact : पालकांच्या परवानगीशिवाय 'No Social Media'! केंद्राचा मसुदा तयार, ऑनलाइन सुरक्षेसाठी महत्वाचं पाऊल

६२ लाखांची वसुली

नंदुरबार वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने शहरात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत ५१ हजार बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला असून या वाहनधारकांकडून ६२ लाखाची वसुली करण्यात आली आहे.

कारवाई आणखी तीव्र होणार

नंदुरबार वाहतूक पोलिसांकडून वर्षभर करण्यात आलेली कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. मार्च एंडिंग असल्याने या कालावधीत वाहतूक पोलिसांचे अधिक लक्ष असून विना लायसन्स, सिग्नल तोडणे, बेशिस्त वाहन पार्क, बेशिस्त गाडी चालविणे अशांवर लक्ष राहणार असून त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply