Nandurbar : थरारक..रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला; पुराच्या पाण्यात कार वाहिली, सुदैवाने दोघांचे प्राण वाचले

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीला पूर आला आहे. या नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. यात वाहन चालकाला रस्ता माहीत नसल्याने या पुलावरून मार्गस्थ होताना रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात वाहून जाताना थोडक्यात वाचली आहे. तर या कारमधील दोघांचे प्राण देखील वाचले आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नजीक महामार्गावरील मोठ्या पुलाजवळ असलेल्या छोट्या पुलावर सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली. महामार्गावर दिशादर्शक फलकाचा अभावामुळे रस्ता समजून येत नाही. यामुळे रात्री अपरात्री अपघाताची घटना घडत आहे. त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व महामार्ग ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आता पुराचे पाणी वाहत असल्याने पुलावरील खड्डे देखील लक्षात येत नाहीत. 

Vanraj Andekar : सख्ख्या बहिणींनीच रचला वनराज आंदेकरच्या हत्येचा कट? धक्कादायक कारण उघड

याच दरम्यान पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने कार चालकाला पाण्याचा प्रवाह व फरशी पुलावरील खड्ड्यांचा अंदाज आला नाही. यामुळे पाण्यात कार मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात कार पाण्यात वाहून जात होती. पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली आहे. या कारमध्ये प्रद्युम बाळू चव्हाण व सुमित भोसले (रा. छडवेल कोरडे) हे दोन प्रवासी यातून थोडक्यात बचावले आहेत. नवापूरकडून नंदुरबारच्या पिंपळामार्गे जात असताना घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पाण्यामध्ये अडकलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply