Nandurbar : कंटेनरमधून ४६ लाखांची अवैध दारू जप्त; गुजरातकडे जात असताना पोलिसांची कारवाई

नंदूरबार : महाराष्‍ट्र गुजरात सिमा रेषेवरून अवैध गुटखा व दारूची वाहतुक केली जात असते. अशाच प्रकारे महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरमधून ४६ लाखाचा अवैद्य दारू साठा नंदुरबार पोलीस दलाकडून जप्त करण्यात आला आहे.

नंदुरबार पोलिसांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर गावालगत महालक्ष्मी हॉटेल जवळ सापळा रचला. या दरम्‍यान एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रातून अवैधरीत्या गुजरात राज्यात विदेशी दारूसाठा मिळून आला आहे. या कारवाईमुळे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना चांगलीच चाप बसली आहे.

कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी बनावट विस्की दारूचे बॉक्स मिळून आले असून तब्बल ४६ लाख ५ हजार ३२० रुपयांची दारू असल्याचा माहिती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हा मद्य साठा कोणाचा आहे? याची सखोल चौकशी पोलीस दलाकडून केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply