Nandurbar News : ६५ लाख ३२ हजार किमतीचा गुटखा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कार्यवाही

Nandurbar News : वाहतूक व विक्रीस बंदी असताना देखील सर्रासपणे गुटखा वाहतुक केली जात आहे. कारवाई होऊन देखील छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. असाच अहमदाबादहून कर्नाटकच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला पकडून सुमारे ६५ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे पोलिसांना हा माल मिळून आला. 

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार तळोदा- पिसावर ते प्रकाशा रोडवरील देवपाट नाला जवळील एका पेट्रोलपंपासमोर टेम्पो संशयितरीत्या पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिले. त्या नंतर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात सुमारे ५८ लाख ३२ हजार रुपये किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी व सात लाख रुपये किमतीचा टेम्पो असा ६५ लाख ३२  हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Bhandara Accident News : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी ठार, घटनेनं अख्खं गाव हळहळलं

नाकाबंदीमुळे झाली कारवाई 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून या काळात प्रलोभन देण्यासाठी पैशांची वाहतूक होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असून याच नाकाबंदीमुळे ६५ लाखाचा गुटखा पोलिसांना आढळून आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *