Nandurbar News : भगर खाल्ल्याने १२५ जणांना विषबाधा; नंदुरबार जिल्ह्यातील दोन गावात घटना

Nandurbar News : महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक ठिकाणी भाविकांना भगर व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी देखील फराळ करण्यात आला होता. दरम्यान भगर खाल्ल्याने जवळपास १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे (ता. नंदुरबार) तसेच वडाळी (ता. शहादा) या गावात भाविकांना विषबाधा झाली. 

सध्या वातावरणातील बदल आणि खराब दर्जाची भगर खाल्ल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील सुमारे ७५ जणांना विषबाधा झाली. यापैकी ४० जणांवर रनाळे ग्रामीण रुग्णालयात, तर सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. भगरीचा फराळ केल्यानंतर सायंकाळी अनेकांना चक्कर येणे, मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. बाधित रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. जिल्हा शल्यचिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले.

Sanjay Raut News : गडकरींचे तिकीट कापणार; PM मोदी नागपूर किंवा पुण्यातून लढणार... संजय राऊतांचा मोठा दावा

वडाळी परिसरात भगरीतून ५० जणांना विषबाधा
वडाळी (ता. शहादा) परिसरातील नागरिकांनी महाशिवरात्रीच्या  उपवासाला भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ५० ते ५५ जणांना विषबाधा झाली असून, यातील ४० जणांना वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply