Nanded Triple Murder Case: Key Accused 'Shahrukh Kabutar' Tracked via Instagram Status and Arrested in Hyderabad

नांदेड: इन्स्टाग्राम स्टेटसमुळे 'कबुतर' पोलिसांच्या जाळ्यात; अर्जितसिंह चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक

Nanded Triple Murder Case: Key Accused 'Shahrukh Kabutar' Tracked via Instagram Status and Arrested in Hyderabadनांदेड: नांदेड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्रिपल मर्डर प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी शाहरुख उर्फ 'कबुतर' याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांपासून लपून बसलेला हा आरोपी सोशल मीडियावर सक्रिय होता आणि त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसमुळेच पोलिसांना त्याचा माग काढणे सोपे झाले.

नेमकी कारवाई काय?
नांदेडमधील ई-स्क्वेअर परिसरात ३ एप्रिल रोजी जुन्या वादातून गँगवॉर भडकले होते, ज्यामध्ये अर्जितसिंह चव्हाणसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर शाहरुख उर्फ कबुतर फरार झाला होता. तो सतत आपले ठिकाण बदलत होता, मात्र सोशल मीडियावर दररोज नवनवीन स्टेटस ठेवत होता. तांत्रिक तपासाद्वारे तो हैदराबादमध्ये असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे सापळा रचून त्याला आणि त्याचा साथीदार शेख आबेद याला बेड्या ठोकल्या.

राजकीय कनेक्शनची चर्चा:
शाहरुख कबुतर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचे नांदेडमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या राजकीय कनेक्शनमुळेच तो इतके दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय होतं प्रकरण?
३ एप्रिलच्या मध्यरात्री अर्जितसिंह चव्हाण हा 'धुरंधर' सिनेमा पाहून बाहेर आला असताना त्याच्यावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अर्जितसिंहचा मृत्यू झाला. यानंतर, बदला घेण्याच्या हेतूने अर्जितसिंहच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दुसऱ्या गटातील सय्यद आवेज आणि मोहंमद अरबाज यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली होती. या थरारक गँगवॉरने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आतापर्यंत या प्रकरणात दोन्ही गटांतील ६ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “नांदेड: इन्स्टाग्राम स्टेटसमुळे 'कबुतर' पोलिसांच्या जाळ्यात; अर्जितसिंह चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक

Leave a Reply to Esther3214 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *