Nanded Accident News : रुग्णवाहिकेचा फुटला टायर; घडला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, चाैघे गंभीर जखमी

Nanded Accident News : नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले आहेत. 

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : नांदेड शासकीय रुग्णालय विष्णुपरी येथे रुग्णांना घेऊन येणाऱ्या भरधाव वेगातील रुग्णवाहिकेचे समोरील टायर फुटला. यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली जाऊन पालटली. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

Beed News : धक्कादायक! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी पेटवण्याचा प्रयत्न; बीडमध्ये खळबळ

या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेतील एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य चाैघा जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply