
Nana Patole : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे, महाराष्ट्रातील एका व्यक्तीला, माजी मुख्यमंत्र्यांना एका भागात जावू न देणे, ते त्या ठिकाणी आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं सांगणे आणि त्या माध्यमातून त्यांचे पोस्टर फाडले जात असतील तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या उपाययोजना करून महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र फिरायला मनाई करीत असेल तर या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करू असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात कधीही एवढ्या खालच्या पातळीचं आणि हेवेदाव्याचं राजकारण झालेलं नाही. मात्र आता भाजपचं सरकार घाणेरडं राजकारण करतेय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.
|
|
महाविकास आघाडीवर परिणाम नाही
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीवर काहीच परिणाम पडणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात जनमानसाचा पक्ष आहे. लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. जे आमच्या बरोबर भाजपच्या विरुद्ध लढायला तयार असतील, त्यांना सोबत घेवून चालायची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या कुटुंबात काय होतं, काय नाही होत, हे बघण्याच कारण आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीवर दिली.
सरकारचेच लोक या ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील
ललित पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सरकारचेच लोक ही ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील आहेत आणि म्हणून ललित पाटीलला त्रास होऊ नये, म्हणून याची काळजी सरकारकडून जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था दिल्या गेल्या होत्या. राज्यातील तरुण पिढी बरबाद करणारा हा ललित पाटील, त्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत जोडले गेलेले आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स महाराष्ट्रात येतोय. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची प्रॉपर हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून चौकशी करावी ही मागणी काँग्रेसने केलेली आहे.
नाना पटोले म्हणाले की, राज्यातील तरुण पिढी आणि कुटुंब उद्ध्वस्त करणं हे काम भाजप मुद्दामहून करतेय का? असा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळं याच्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. ललित पाटील हा चेहरा दिसतोय पण त्याच्या मागे सत्तेत बसलेले लोक सहभागी आहेत, हे आपल्याला लक्षात येतं.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

