Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय तापमान वाढणार; विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज—कोणते मुद्दे ठरणार गाजवे?

Nagpur : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालना नागपुरात आजपासून सुरूवात होत आहे, हिवाळी अधिवेशनात पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आजपासून १४ डिसेंबरदरम्यान होणारे विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारच्या बाजूनेही तोडीस तोड उत्तर देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार आहेत. तर यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार प्रमुख मोर्चे विधानसभेच्या दिशेने कूच करणार आहेत.

Nagpur : अधिवेशनापूर्वी मोठी राजकीय हालचाल: पडद्यामागील घडामोडीनंतर चहापान कार्यक्रमाला विरोधकांचा बहिष्कार

विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला असताना दुसऱ्या बाजूने जनतेच्या मागण्याचा आगडोंब उसळणार असल्याचे चित्र आहे. नागपूर शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात, वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याशिवाय चौकातील कॅमेऱ्याची नजर असेल सोबतच ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेऱ्याची नजर असेल.

ऑपरेशन सिंदूर नंतर Jaish-e-Mohammad कडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांकडून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उपराजधानी नागपूर हायअलर्टवर आहे. हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधील RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक ठिकाणे गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर ठेवण्यात आली आहे.

विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त, मुख्य स्थळांची बॉम्बशोधक नाशक पथकांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. CCTV, आणि AI-आधारित नजर ठेवणीद्वारे संवेदनशील परिसराची सतत मॉनिटरिंग केले जात आहे. हिवाळी अधिवेशनासाठी फोर्स वन तुकड्या नागपूरात तैनात, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिरिक्त 3 हजारावर पोलिस अधिकारीकर्मचारी दाखल झाले आहेत. SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण 10 हजार पोलिसांची उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *