Nagpur News : नवऱ्याला रात्री झोपेच्या गोळ्या द्यायची, परपुरूषासोबत हॉटेल जायची; मुलीमुळे महिलेचं बिंग फुटलं

Nagpur News : आधी व्यापारी नवऱ्याला रात्रीच्या जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायची. झोपेच्या गोळ्यांमुळे नवऱ्याला झोप अनावर व्हायची. नंतर बायको रात्रभर परपुरूषासोबत हॉटेलमध्ये रात्र घालवायची. ही धक्कादायक घटना नागपुरात घडलीय.

मागच्या काही दिवसांपासून बायकोकडून हा प्रकार सुरूच होता. नवऱ्याला वारंवार झोपेबाबात शंका येतच होती. मात्र, मुलीच्या बिगडलेल्या तब्येतीमुळे नवऱ्यानं बायकोला रंगेहाथ पकडलं. या घटनेनंतर नवऱ्याने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पण मुलीमुळे त्यांनी ही तक्रार मागे घेतली. या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील महिला एका व्यापाऱ्याची पत्नी आहे. ही महिला रात्रीच्या जेवणातून पतीला झोपेच्या गोळ्या द्यायची. नंतर हॉटेलमध्ये जात परपुरूषासोबत रात्र घालवायची. झोप अनावर होत असल्यामुळे काही दिवसांनी पतीला संशय येऊ लागला. तसेच रात्री पत्नी बाहेर जाते का? हा देखील संशय नवऱ्याच्या मनात घोंघावत होता.

Ulhasnagar Crime : पत्नीला गुंगीचं औषध दिलं, नंतर अश्लील व्हिडिओ काढले; अन् मित्राला पाठवले..

हा संशय बळावत गेला आणि मुलीमुळे बायकोचं कृत्य समोर आलं. नवऱ्याने बायको रात्री कुठे जाते? हा शोध घेण्यासाठी बायकोच्या गाडीला जीपीएस बसवलं. एके दिवशी नियमितप्रमाणे पत्नीनं जेवणात झोपेच्या घालून नवऱ्याला जेवायला दिलं. नवरा जेवला आणि झोपी गेला. मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागलं. आई जवळपास दिसत नसल्यामुळे तिने वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्यांमुळे वडिलांची झोप अनावर झाली होती. मुलीनं तातडीने काकांना फोन लावून बोलावून घेतलं. काकांनी भावाला जागं केलं.

नवऱ्याने तातडीनं पत्नीच्या गाडीला बसवलेल्या जीपीएसवरून लोकेशन काढलं आणि त्यांनी हॉटेल गाठलं. हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी गोपनियतेचं कारण देत प्रवेश नाकारला. मात्र, व्यापाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी कारण सांगत प्रवेश मिळवला. खोलीत पत्नी आक्षेपार्ह स्थितीत पाहून नवऱ्याला राग अनावर झाला. त्यांनी पोलीस ठाणे गाठत पत्नीविरूद्ध तक्रार दाखल केली. मात्र, मुलीमुळे त्यांनी तक्रार मागे घेतली. या घटनेनंतर व्यापारी पतीनं पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे बायको आणि माहेरी राहत आहे. या भयंकर घटनेनंतर नागपुरातील वर्धा परिसरात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply