Nagpur News : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटले; चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू, समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वरील घटना

Nagpur News : अवैधरित्या गाईची तस्करी करणारे पीकअप वाहन समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून निघालेले हे वाहन समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या गाईची तस्करी करत होते.

दरम्यान, समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर हे पीकअप वाहन आले असता अचानक हा अपघात झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी पीकअप गाडी चालक आणि अन्य एका संशयित आरोपीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरुन  पुन्हा गो-तस्करी होतेय का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.  

Eknath Shinde Vs Sharad Pawar : मोदी काय चीज आहे म्हणणाऱ्या शरद पवारांना मुख्यमंत्र्यांकडून सडेतोड उत्तर; म्हणाले

अपघातात चार गाईंचा जागीच मृत्यू  

या प्रकरणातील वाहनचालक जुबेर जान मोहम्मद कुरेशी आणि रिझवान उर्फ रिझु रौब खान दोघे ही कामठीचे रहिवासी आहेत. यात संशयित आरोपींनी पीकअप गाडीमध्ये तब्बल 13 गाई कोंबून भरल्या होत्या. त्यानंतर ते समृद्धी मार्गाने वर्धेकडे जाण्यासाठी निघाले असता समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट जवळ भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. त्यामुळे गाडीत असलेली सर्व जनावरे खाली फेकल्या गेलीत. यामध्ये 4  गाईंचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर गाईना जबर मार असल्याची माहिती समोर आली आहे.  

अपघातात गाडीचालक जखमी

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ, हवालदार अरुण इंगळे आणि इतर स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दोन्ही संशयित आरोपी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच मृत गाईंचा पंचनामा करण्यात आला. तर उर्वरित 9 गायींना नागपूर येथील गोरक्षण समितीकडे देण्यात आले आहे. 

 गो तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल 

या प्रकरणातील संशयित आरोपींनी 13 गायी कत्तलखान्यात नेण्यासाठी अवैधरित्या गाईची वाहतूक केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गो-तस्करांनी केला पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

नागपूरात गोवंश तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता पोलिसांना चिरडण्यास सुद्धा भीत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पारडी-कन्हान या मार्गावर गो-तस्कर मालवाहू वाहनाने गोवंशांना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्यासाठी सापळा रचला होता. संशयास्पद ट्रक येताना पाहून पोलीस पथक सतर्क झाले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा आदेश दिला.  मात्र, गो तस्करी करत असलेल्या वाहन चालकाने ट्रक थांबवण्याऐवजी गती आणखी वाढवली आणि ट्रक पोलिसांच्या दिशेने घेऊन गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस भांभावले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, तोपर्यंत तो चालक ट्रक घेऊन पळून गेला. पोलीस या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply