पुणे :  पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा खून; एका तरुणीसह ५ जणांना अटक

पुणे : अमरामवती येथील एका पोलिस निरीक्षकाच्या मुलावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खुन करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. वर्षा सुरेश कमने उर्फ महेक अरमान शेख (वय २०, रा. काळे बोराटेनगर, हडपसर), अरबाज उर्फ अल्लाउद्दीन शेख (वय २१), भैय्या उर्फ प्रदीप अंकुश चव्हाण (वय २०), आकाश जगन्नाथ देवकाते (वय २०, सर्व रा. माढा, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

गिरीधर उत्रेश्‍वर गायकवाड (वय २१, रा. गोपळपट्टी पार्क साई टॉवर, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती. याप्रकरणी गिरीधरचा भाऊ निखिलकुमार गायकवाड (वय २७) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गिरीधरचे वडील उत्रेश्‍वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कारागृह निरीक्षक म्हणून काम करीत आहेत.

गिरीधर मंगळवारी रात्री दहा वाजता त्याच्या घरी बसला होता. त्यावेळी त्याला एक फोन आल्यानंतर तो घराबाहेर जाऊ लागला. त्यावेळी त्यास फिर्यादीने विचारणा केल्यानंतर तो, मैत्रीणीने बोलाविले असल्याने तिला भेडून येतो असे सांगून गेला. दरम्यान, अर्धा तासानंतरही गिरीधर घरी न परतल्याने त्याच्या आई, भावाला काळजी वाटू लागली. त्याचवेळी त्याच्या वडीलांनी दोघांना गिरीधरचा खुन झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे व अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

तरुणी व गिरिधर एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी तरुणीचा तिच्याच वर्गातील एका तरुणासमवेत प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तरुणी व गिरिधर यांच्यात जवळीक वाढली होती. याच कारणावरून तरुणी व तिच्या पतीची भांडणे होत होती. दरम्यान, मंगळवारी रात्री तरुणीच्या पतीने मद्यपान केल्यानंतर गिरिधरला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे गिरिधर आल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply