Mumbra Shiv Sena Shakha : उद्धव ठाकरेंच्या भेटीआधीच मुंब्र्यात वातावरण तापलं; शिवसेना शाखेवरून ठाकरे - शिंदे गटात जुंपली

Mumbra Shiv Sena Shakha : मुंब्रा येथील सेनेच्या शाखेची पाहणी करण्याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे आज (शनिवार) येणार आहेत. याच शाखेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे यांची आजची शाखा भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांचा स्वागताचे बॅनर काही अज्ञातांनी फाडले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे अधिष्ठाता पदमुक्त, सर्जन सस्पेंड

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन ठाणे पोलीसांना आपण होर्डिंग्ज फाडण्यात येतील अशी माहिती दिली, त्यांनी निश्चित राहा असं सांगितलं तरी देखील होर्डिंग्ज फाडण्यात आल्याचं म्हटलं आहे. आव्हाडांनी फाडलेल्या होर्डिंग्जचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

दूसरीकडे मुंब्रा येथील शाखेवर कोणी येणार असेल तर आम्ही त्यांना अडवणार असा इशारा शिंदे गटाचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाकरे येणार असल्याने गर्दी करण्यासाठी माणसांना पैसे वाटवे लागत आहेत हे दुर्देवच म्हणावे लागले असे म्हटले आहे.

दरम्यान या दाेन्ही गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी (कलम 149 नूसार) नोटीस बजावली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या दाै-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त माेठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे.

संजय राऊत यांचे पाेलीस आयुक्तांना आव्हान

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रात येथे जाणार आहोत असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ. राज्यात मोगलाई सुरू आहे. आता बुलडोझर फिरवत आहेत बाळासाहेब ठाकरे शाखांच्या कार्यालयांना मंदीर मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहे. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आहेत त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहे.

पोलिसांच्या समोर बॅनर फाडत आहेत. जे आता आम्हाला अडवात होते त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते.जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहेत 31 नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार नाहीत. आम्ही येत आहे तुम्ही आम्हाला अडवून दाखवा असे आव्हान पोलीस आयुक्तांना राऊत यांनी दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply