Mumbai Underground Metro : मुंबईची पहिली अंडरग्राउंड मेट्रो आली; कधीपासून धावणार, मार्ग आणि स्थानकं कोणकोणती?

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी या मेट्रोविषयी माहिती दिली आहे. मुंबईकरांना या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील या भूमिगत मेट्रोमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे.

विनोद तावडे यांनी एक्सवर पोस्ट करत भूमिगत मेट्रोची माहिती दिली आहे. तावडे यांनी म्हटलं की,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांच्या जीवनात सुधारणा आणण्याची गॅरंटी दिली आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रोचा लवकरच शुभारंभ होणार आहे. त्यामुळे सरकारने मोठं आश्वसन पूर्ण केलं आहे'.

Pune : शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल २१४ शाळांचा शून्य टक्के निकाल; शिक्षण विभागाचा संताप; शिक्षकांची वेतनवाढच रोखली!

विनोद तावडे यांनी पंतप्रधान मोदी यांना टॅग करत पुढे म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुंदर करण्याची गॅरंटी दिली होती. ती गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही २४ जुलै रोजी सुरु आहे. या मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी भर पडणार आहे'.

सरकारच्या वेबसाईटनुसार,मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही २४ जुलैपासून धावणार आहे. या मेट्रोचं अंतर ३३.५ किलोमीटर असणार आहे. आरे कॉलनी ते कफ परेडपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या मार्गात २७ स्थानके असणार आहेत.

पोस्टमध्ये पुढे म्हटले की, नव्या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास सुकर होईल. शहरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. जुलै महिन्यात भूमिगत मेट्रो लाँच करण्यात येणार आहे.

भूमिगत मेट्रोचे वैशिष्ट्ये काय आहेत?

या मेट्रो प्रकल्पाला ३७००० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. या मार्गावरील सेवा सकाळी ६.३० वाजता सुरु होईल. तसेच रात्री ११ वाजेपर्यंत ही सेवा सुरु आहे. ही मेट्रो ९० किलोमीटर प्रती तासांच्या वेगाने धावणार आहे. ३५ किलोमीटर प्रवासासाठी ५० मिनिटे लागण्याची शक्यता आहे. रस्त्यावरून इतक्याच मार्गावर प्रवास करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो.

या मार्गावरील २७ स्थानके

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, कलाबादेवी, गिरगांव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूज, सांताक्रुज एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, एसईईपीज आणि आरे डेपो



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply