Mumbai : मुंबईहून पुण्याला अवघ्या ४८ मिनिटांत! केंद्र सरकारची मोठी घोषणा; प्रवाशांना काय-काय फायदे होणार?

Mumbai : केंद्रीय अर्थसंकल्पात निर्माला सीतारामन यांनी देशातील ७ हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली. यामध्ये मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे. मुंबई-पुणे आणि पुणे हैदराबाद असे २ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात सीतारामन यांनी केली. त्यामुळे भविष्यात मुंबई आणि पुणे ही दोन शहरे आणखी जवळ येणार आहेत. हायस्पीड कोरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अतंर फक्त ४८ मिनिटांत पार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी वेगात होईलच, त्याशिवाय रोजगार आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे.

हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे आर्थिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र हाकेच्या अंतरावर येणार आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासात होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. देशातील ७ कॉरिडॉरची लांबी ४००० किमी इतकी आहे. यासाठी १६ लाख कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. देशातील प्रमुख शहरे, आयटी हब अन् धार्मिक स्थळे जोडण्याचा केंद्राचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून ७ हायस्पीड कॉरिडॉरची घो,णा करण्यात आली. त्यामधील मुंबई आणि पुणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. या दोन शहरात प्रवासासाठी सध्या ३ ते साडेतीन तास लागतात. पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हा प्रवास फक्त ४८ मिनिटांवर येणार आहे. व्यापारावर्गासोबतच विद्यार्थ्यांना अन् नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल, असे म्हटले जातेय.

Pimpri chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगेंनी बाजी मारली, थेट महापौरपद खेचलं; पण भाजपमध्ये नाराजी वाढली, नेमकं काय घडतंय?

७ हायस्पीड रेल्वे कोणत्या ?
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बंगळूर
हैदराबाद-चेन्नई
चेन्नई-बंगळूर
दिल्ली-वाराणसी
वाराणसी-सिलीगुडी
प्रस्तावित कॉरिडॉरमुळे वेळेची बचत
१. मुंबई ते पुणे : ४८ मिनिटे
२. पुणे ते हैदराबाद : १ तास ५५ मिनिटे
३. हैदराबाद ते बंगळूर : २ तास
४. हैदराबाद ते चेन्नई : २ तास ५५ मिनिटे
५. चेन्नई ते बंगळूर : १ तास १३ मिनिटे
६. दिल्ली ते वाराणसी : ३ तास ५० मिनिटे
७. वाराणसी ते सिलिगुडी : २ तास ५५ मिनिटे
एकूण लांबी : सुमारे ४ हजार किमी
एकूण खर्च : १६ लाख कोटी रुपये

मुंबई आणि पुण्यातील अंतर किती आहे?
हाय-स्पीड रेल्वेमुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील १५० किमीचा प्रवास एका तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार आहे. पुणे आणि हैदराबादमधील प्रवासाला सध्या आठ ते नऊ तास लागतात, पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हे अंतर फक्त ३ ते ४ तासांत पूर्ण होईल. हाय-स्पीड रेल्वे मार्गांवरील गाड्या किमान २५० ते ३२० किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट मार्गावरील गाड्या ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावतील, असा अंदाज आहे. देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर एनएचएसआरसीएल बांधत आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे.



विडियो गॅलेरी

2 thoughts on “Mumbai : मुंबईहून पुण्याला अवघ्या ४८ मिनिटांत! केंद्र सरकारची मोठी घोषणा; प्रवाशांना काय-काय फायदे होणार?

Leave a Reply to Penelope673 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *