Mumbai Pune Expressway Accident : बाेर घाटात मालवाहतुकीच्या वाहनांचा अपघात, विद्यार्थ्यासह तिघे जखमी

Mumbai Pune Expressway Traffic Update : पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास खंडाळा बोर घाटातील अंडा पॉईंट अवघड वळणावर कंटेनर आणि पीकअँप या दाेन वाहनांची टक्कर झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. 

या अपघातात कंटेनर खाली वाहन सापडले. त्यामुळे वाहनाचे माेठं नुकसान झाले. तसेच वाहनातील चालक केबिनमध्ये अडकल्याने ताे गंभीर जखमी झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. तसेच एक विद्यार्थी देखील अपघातात किरकोळ जखमी झाला.

घटनास्थळी खोपोलीतील अपघातग्रस्तांसाठीची असलेली मदतीची टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम सुरू त्यांनी केले. या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु आहे.

वाहतुक सुरळीत सुरु

० मुंबई पुणे महामार्गावर पहाटे बोरघाटात कंटेनर व पिकअपमध्ये अपघात

० तीन जण जखमी

० खोपोली हद्दीतील बोरघाटात झाला अपघात

० दोन प्रवाश्यांना अपघातानंतर लगेचच बाहेर काढण्यात आले. एका प्रवाशाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश.

० मदत आणि बचाव कार्यासाठी देवदूत, IRB यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमची घटनास्थळी दाखल.

० वाहतुक सुरळीत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply