Mumbai Latest News : मुंबईवर पुन्हा अतिरेक्यांची नजर, तीन अतिरेकी घुसल्याची पोलिसांना फोनवरून माहिती

Mumbai News : मुंबई पोलिसांना मुंबईत अतिरेकी घुसल्याच्या फोन आलेला आहे. दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले, अशी माहिती फोनवरून पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला होता. मुंबईत आलेल्या अतिरेक्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा हा राजा ठोंगे या व्यक्तीने केला आहे.

राजा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांना अतिरेकी संबंधित माहिती देणारे राजा ठोंगे हे पुण्याचे असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांना पुन्हा कॉल केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी

याआधी पुण्यातील कोरेगाव पार्कात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली होती. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल आला होता. या खोट्या कॉलमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply