मुंबई: बोरीवली आणि कांदिवलीदरम्यान लोकल ट्रेनला वारंवार होणारा अनावश्यक थांबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाचव्या आणि सहाव्या मार्गाचा काही प्रमाणात लोकलसाठी वापर सुरू केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रयोगामुळे बोरिवलीकडे जाताना लोकल गाड्यांना मध्येच ताटकळत थांबण्याची वेळ टाळता येत असून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बोरीवली आणि कांदिवलीदरम्यान लोकल अनेकदा सिग्नल यंत्रणेमुळे एक ते पाच मिनिटे जादा थांबते. या वारंवार होणाऱ्या अनावश्यक आणि कंटाळवाण्या थांब्याला वैतागलेल्या प्रवाशांनी मागील काही महिन्यांपासून उपरोधिकपणे 'थांबिवली' असे नाव दिले होते. प्रवाशांच्या या समस्येची दखल घेत पश्चिम रेल्वेने या महिन्यापासून बोरिवली ते सांताक्रूझदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचा काही भाग किंवा संपूर्ण मार्ग लोकलसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.
सध्या दररोज बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या किमान १० लोकल गाड्या पाचव्या मार्गावरून चालविल्या जात आहेत. या विशेष लोकल सेवा प्रामुख्याने गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त (non-peak hours) चालविल्या जातात. हा मार्ग कांदिवली कारशेडच्या बाजूने मुख्य मार्गापासून वेगळा जात असल्याने कांदिवली-बोरीवलीदरम्यान होणारा अनावश्यक थांबा पूर्णपणे टाळता येतो. या लोकलना गोरेगाव येथे किंवा अंधेरी स्थानकावर थांबल्यानंतर मार्ग बदलून पुढे सांताक्रूझ येथे पुन्हा मुख्य मार्गावर आणले जाते. त्यामुळे 'थांबिवली'चा हा अनावश्यक खोळंबा टळत आहे.
सिग्नल यंत्रणेमुळे होतो वेळापत्रकावर परिणाम बोरीवली-कांदिवलीदरम्यान सिग्नलसाठी रूट रिले इंटरलॉकिंग (RRI) यंत्रणा लागू झाल्यापासून बोरीवली स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी लोकल गाड्यांना अनेकदा तांत्रिक थांबा घ्यावा लागतो. यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. पाचवा आणि सहावा मार्ग प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या (long-distance) आणि उपनगरीय लोकलच्या वाहतुकीचे योग्य विभाजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या नव्या मार्गांचा वापर करतात, ज्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. सध्या कांदिवली-बोरीवलीदरम्यान सहावा मार्ग पूर्णपणे उपलब्ध नसला, तरी खार-सांताक्रूझ ते कांदिवलीदरम्यान तो उपलब्ध आहे.
रेल्वे बोर्डाकडून बोरीवलीत सिग्नल यंत्रणेची पाहणी बोरीवली येथील ट्रेन संचालन, सिग्नल यंत्रणा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नुकतीच रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत विशेष भेट दिली. या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी बोरीवली येथील नियंत्रण कक्षाची (Control Room) पाहणी केली. तसेच, बोरीवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वर पूर्वी असलेल्या सिग्नल यंत्रणेचीही कसून पाहणी केली. या प्लॅटफॉर्मवर अनेक लोकल फेऱ्या समाप्त (terminate) होतात. त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणा, ट्रेन संचालनाची कार्यक्षमता आणि त्याचा लोकलच्या वेळेवर होणारा परिणाम याचा सखोल आढावा या पाहणीदरम्यान घेण्यात आला असून, भविष्यात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




