Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० उशिराने; प्रवाशांचे हाल

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या इजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एक्स्प्रेस उंबरमाळी रेल्वे स्थानकावर थांबून असल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गेल्या तासाभरापासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी प्रवाशांचे हाल होत आहे.

एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती उंबरमाळी रेल्वे स्थानकावरच थांबून आहे. कल्याणमधून दुसरे इंजन मागवले असून त्या इंजिनच्या सहाय्याने एक्स्प्रेस पुढे काढण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे. त्याचसोबत लांबपल्ल्याच्या ट्रेनचे वेळापत्रक कोलमडलं.

Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..

याघटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसएमटी ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू असल्याचे अनाऊंसमेंट केली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply